शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपकडून सत्तेचा गैरवापर : अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 21:34 IST

सांगली : सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेतील सत्तेची खुर्ची मिळविण्यासाठी भाजपचे नेते राज्यातील सत्तेचा गैरवापर करीत आहेत. या ठिकाणच्या विकासकामांना जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात आहेत,

सांगली : सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेतील सत्तेची खुर्ची मिळविण्यासाठी भाजपचे नेते राज्यातील सत्तेचा गैरवापर करीत आहेत. या ठिकाणच्या विकासकामांना जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात आहेत, अशी टीका कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केली.

ते म्हणाले की, महापालिकेचा निधी नियोजन समितीकडे वर्ग करणे, एलबीटीचे अनुदान उशिरा देणे, आयुक्त व तत्सम अधिकाऱ्यांना सरकारच्या इशाºयाप्रमाणे काम करण्यास भाग पाडणे, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी सत्तेच्या गैरवापरातून भाजपकडून केल्या जात आहेत. लोकशाहीला मारक असणाºया सर्व गोष्टींचा अंगीकार भाजपने केला आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील नागरिक विकासकामांपासून वंचित राहून त्याचा फटका सत्तेवर असलेल्या पक्षाला व्हावा, असा त्यांचा उद्देश आहे. भाजपचा हा डाव आम्ही उधळून लावल्याशिवाय राहणार नाही. कॉँग्रेस अशा गोष्टींचा मुकाबला करण्यास सज्ज आहे. राष्टÑवादीसोबत आघाडी करायची की नाही, याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवरील नेते व कार्यकर्त्यांच्या मतावर अवलंबून आहे. त्यांना विश्वासात घेऊनच आम्ही आमचा फैसला जाहीर करू. त्यासाठी लवकरच स्थानिक नेतेमंडळी व कार्यकर्ते बैठक घेतील.

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये भाजपच्या काळात ३८ टक्के वाढ झाल्याची माहिती एनसीआरबी (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो)नेच दिली आहे.शेतकरी, कामगार वर्गाचेही हाल सुरू आहेत.मतपत्रिकांचा वापर करादेशात अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्राबाबत लोकांच्या मनात शंका आहे. वारंवारच्या संशयास्पद निकालांमुळे या चर्चेस बळ मिळत आहे. त्यामुळे राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांत मतपत्रिकांचा वापर करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण